सिंधुदुर्गनगरी :
शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून, ग्रामिण भागातील जनतेचे राहणीमान उंचावण्यास व समस्या सोडवण्यास सर्वतोपरी मदत करणाऱ्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. दरवर्षी 2 ऑक्टोबर, गांधी जयंतीच्या दिवशी हे आदर्श ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
यंदाच्या वर्षी जिल्हास्तरीय प्रशासकीय समितीने आदर्श ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पुरस्कारासाठी पुढील प्रमाणे निवड केली आहे. कणकवली तालुक्यातील सावडव, ओटवचे ग्रामसेवक शशिकांत शांताराम तांबे, मालवण तालुक्यातील देवबागचे ग्रामसेवक युवराज गिरीधर चव्हाण, दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रलचे ग्रामसेवक विजय परशराम जाधव, देवगड तालुक्यातील नाद व विघिवरे-वेळगीवेचे ग्रामसेवक विजय सुरेश मलगुंडे, कुडाळ तालुक्यातील माणगांवचे ग्रामविकास अधिकारी विलास जयराम कोलते, वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे गावचे ग्रामसेवक भूषण दत्तात्रय चव्हाण, वैभववाडी तालुक्यातील आचिर्णेचे ग्रामसेवक शिवाजी सोपानराव कदम आणि सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरीच्या ग्रामसेवक लिला वसंत मोर्ये यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांचे जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, विषय समिती सभापती सावी लोके, रविंद्र (बाळ) जठार, शारदा कांबळे, माधुरी बांदेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा समान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, प्रकल्प संचालक व उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचाय विभाग दिपाली पाटील यांनी अभिनंदन केले आहे.