You are currently viewing कुडाळ हायस्कूल १० वी पास विद्यार्थ्यांचे कुडाळ शहर काँग्रेस तर्फे अभिनंदन

कुडाळ हायस्कूल १० वी पास विद्यार्थ्यांचे कुडाळ शहर काँग्रेस तर्फे अभिनंदन

कुडाळ :

 

राष्ट्रीय काँग्रेस कुडाळ शहर यांच्या वतीने एसएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या कुडाळ हायस्कूल विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यंदा कुडाळ हायस्कूल दहावीच्या परीक्षेत विद्या वालावलकर (प्रथम क्रमांक), सेजल शारबिद्रे (द्वितीय क्रमांक), तन्वी चिपकर (तृतीय क्रमांक) पटकावले आहे.

कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, नगराध्यक्ष आफ्रीन करोल, बालकल्याण सभापती अक्षता खटावकर, विधानसभा अध्यक्ष मंदार शिरसाट, अल्पसंख्यांक अध्यक्ष तबरेज शेख, शहर महिलाध्यक्ष शुभांगी काळसेकर, तालुका उपाध्यक्ष रंजना दळवी, कार्यकारणी सदस्य वैभव आजगावकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा