सावंतवाडी
येथील देशभक्त शंकराव गवाणकर महाविद्यालयाचा तृतीय वर्ष बी. एम. एस (बॅचलरऑफ मॅनेजमेंट स्टडीज) चा निकाल १००% टक्के लागला आहे. दरम्यान या परीक्षेत सिद्धेश श्यामसुंदर येरम याने महाविद्यालयासह जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तर मयुरेश मळीक आणि गौरी नाईक यांनी महाविद्यालयातून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
या परीक्षेसाठी महाविद्यालयातून एकूण ५६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. तर प्रथम आलेल्या सिद्धेश येरम याला 10.00 SPGI मिळाले आहेत. दरम्यान यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, सचिव प्रभाकर पाटकर , खजिनदार पंढरी परब, सीनियर एक्झिक्यूटिव्ह प्रवीण प्रभू केळुसकर, डॉ.महेश सातवसे यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये प्राचार्य यशोधन गवस प्रा. आनंद नाईक , प्रा. साईप्रसाद पंडित, प्रा. अस्मिता गवस ,प्रा. सुखदा कुडतरकर ,प्रा.मेधा मयेकर व इतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले..