You are currently viewing २८ नोव्हेंबर रोजी सोनुर्ली श्रीदेवी माऊलीचा लोटांगण जत्रोत्सव

२८ नोव्हेंबर रोजी सोनुर्ली श्रीदेवी माऊलीचा लोटांगण जत्रोत्सव

सावंतवाडी :

 

सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावची ग्रामदेवता श्रीदेवी माऊलीचा लोटांगण जत्रोत्सव मंगळवार दि.२८ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा जत्रोत्सव राज्यात सर्वत्र प्रसिद्ध आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठी लोटगंण जत्रा म्हणून सोनुर्ली श्री देवी माऊलीची जत्रा प्रसिद्ध आहे, देवीचे महात्म्य सातासमुद्रापार पोहोचले असून नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून माऊली चरणी दरवर्षी हजारो भक्तगण नतमस्तक होतात. आपल्या अडी-अडचणी दुर करण्यासाठी देवीकडे लोंटागणाचा नवस बोलला जातो. आणि जत्रोत्सवादिवशी रात्री तो फेडला जातो. नवस केलेल्या महिला उभ्याने मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून हा नवस फेडतात तर पुरुष जमिनीवर लोटांगण घालून नवस फेडतात. दरवर्षी चार ते पाच हजार भाविक लोटांगण घालतात. देवस्थान कमिटी कडून भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी योग्य नियोजन केले जाते.

प्रतिक्रिया व्यक्त करा