You are currently viewing जागतिक योगदिनानिमित्त स्वामी रामदेव महाराज प्रणित पतंजली परिवारातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक योगदिनानिमित्त स्वामी रामदेव महाराज प्रणित पतंजली परिवारातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरी :

 

जागतिक योगदिनानिमित्त येत्या मंगळवारी स्वामी रामदेव महाराज प्रणित पतंजली परिवारातर्फे रत्नागिरीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे माळनाका येथील हॉटेल विवेकच्या मैदानावर होणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पतंजली परिवाराने केले आहे.

या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सकाळी ६ ते ८ या वेळेत कार्यक्रम होणार आहे. यामध्ये जागतिक योग दिनाच्या नियोजित कार्यक्रमानुसार हा कार्यक्रम केला जाणार आहे.

योग ही भारताने संपूर्ण विश्वाला दिलेली अमूल्य देणगी आहे. भारतीय प्राचीन परंपरेचा व संस्कृतीचा सर्व देसांमध्ये प्रचार, प्रसार करण्याचे कार्य अनेक भारतीयांनी केले आहे. यामध्ये योगऋषी रामदेव महाराज यांचे नाव अग्रस्थानी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे २१ जून हा दिवस दरवर्षी सर्व देशांमध्ये जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला आहे. पतंजली परिवाराने आठव्या योगदिनाचे आयोजन केले आहे. यापूर्वी दोन वेळा रामदेव महाराज रत्नागिरी दौऱ्यावर येऊन शिबिर व महिला मेळाव्यात मार्गदर्शन केले आहे.

योग दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महिला पतंजली योग समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य सौ. रमा जोग, भारत स्वाभीमान ट्रस्टचे जिल्हा प्रभारी मारुती अलकुटे, पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी विद्यानंद जोग, पतंजली किसान सेवा समितीचे जिल्हा प्रभारी भारत सावंत, महिला पतंजली योग समितीच्या जिल्हा प्रभारी सुरेखा शिंदे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा