जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी हेमंत कुलकर्णी यांची अप्रतिम काव्यरचना
*आम्ही पुरोगामी*
*वृत्त—लवंगलता( ८ ८ ८ ४)*
आई बाबा मागे सरले
आता डॅडी मम्मी
नव्या युगाचे नवे प्रणेते
आहोत पुरोगामी
हाय नि हॅलो शिकत वाढलो
जन्मता फोन हाती
गेम्स आमचे व्हर्च्युअल नको
घाण वाटते माती
काका काकू दादा वहिनी
नकोच मामा मामी
अंकल आंटी लांब गरज ना
घरात असता टाॅमी
शिकून सवरुन मोठे झालो
आखुड झाले कपडे
दारे खिडक्या बंद करूनी
अंग दाखवू उघडे
चाली रीती प्रथा प्रघाती
बुरसटलेल्या तुमच्या
किटी पार्टीत पब क्लबामध्ये
रात्रि गुजरती अमुच्या
देव धर्म अन राष्ट्रप्रेम ते
वेळेची बरबादी
हे फालतू नि ते टाकावू
खरे सेक्युलरवादी
—हेमंत श्रीपाद कुलकर्णी,
मुलुंड, मुंबई