१५ वित्त आयोग मधून पैसे भरायचे असल्यास तोंडी नको तर मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायतला लेखी आदेश द्यावेत – युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदिप मेस्त्री
कणकवली :
गेल्या महिन्या भरापासुन कणकवली तालुक्यातील स्ट्रीट लाईट जोड़नी बंद असल्याने आज भाजपा युवा मोर्चाच्या वतीने विज वितरण कार्यालयास घेराव घातला. अतिरिक्त कार्यकारी अभियंता गिरीश भगत, उप कार्यकारी अभियंता श्री बगड़े यांच्याशि चर्चा केली असता कणकवली तालुकाच अंधारात का? जिल्ह्यातील सर्व तालुक्यात स्ट्रीट लाईट सुरु असताना कणकवली साठी दुजाभाव का? लाईट जोडनी सुरु करा अन्यथा सोमवारी मोठ्या संख्येने येऊन कार्यालयास टाळे ठोकु असा ईशारा आज उपस्थित मोर्चा पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी संदीप मेस्त्री यानी अधीक्षक अभियंता विनोद पाटिल यांच्याशी फोनवर चर्चा केली, पाटिल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून ४८ तासांत स्ट्रीट लाईट सुरु करा अशी मागणी यावेळी केली.१५ वित्त आयोग मधून पैसे भरायचे असल्यास तोंडी नको तर मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी तसे ग्रामपंचायतला लेखी आदेश द्यावेत असे मेस्त्री यांनी सांगितले.
यावेळी युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदिप मेस्त्री, तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर, संतोष पूजारे, सुभाष मालंडकर, स्वप्निल चिंदरकर, बाबु राणें, बाबु घाडिगावकर, आनंद घाड़ी, परेश कांबळी, सुशांत राउळ, नयन दळवी उपस्थित होते.