कणकवली
वरवडे गावात गेले काही महिने सार्वजनिक ठिकाणचे बॅनर फाडणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, दूरसंचारचे पोल चोरणे, वनराई मधील इमारती झाडे चोरून नेणे, घराजवळील कोंबडी चोरून नेणे, टेरेस वरील पाण्याच्या टाक्या चोरून नेणे, असे प्रकार अनेकदा घडत आहेत. यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा विघातक शक्तींचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांना ग्रामपंचायतीच्यावतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी सरपंच भाई बांदल, उपसरपंच प्रदीप घाडीगांवकर, ग्रा. प. सदस्य अमोल बोन्द्रे, सिरील फर्नांडिस, प्रमोद गावडे, विजय कदम, सादिक कुडाळकर, दशरथ घाडीगांवकर, अनिल घाडी, दिनेश अपराज उपस्थित होते.