You are currently viewing मालवणात आणखी दोन ठिकाणी घरफोडी झाल्याचे उघड…

मालवणात आणखी दोन ठिकाणी घरफोडी झाल्याचे उघड…

मालवण पोलिसांकडून अधिक तपास सुरू…

मालवण

शहरात बाजारपेठ मार्गावरील पाटकर कुटुंबीयांची दोन घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना आज दिसून आली आहे.

काल याच परिसरात काही अंतरावर तीन ठिकाणी घरफोडी झाली होती. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. स्मिता किशोर पाटकर कुटुंबीय बाहेरगावी असल्याने त्यांचे बंद घर चोरट्यांनी फोडले. घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा पिन चोरट्यांनी काढून टाकल्याचे दिसून आले. तर त्याच घराबाजूला हनुमंत पाटकर यांचे स्टोअर रूम घर चोरट्यानी फोडल्याचे आज दिसून आले. पोलीस निरीक्षक विजय यादव व पोलीस पथक तसेच ओरोस येथील ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा