You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा तृतीय वर्ष विज्ञान विभागाचा निकाल १००%

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा तृतीय वर्ष विज्ञान विभागाचा निकाल १००%

वनस्पतिशास्त्र विभागाची विद्यार्थिनी करिश्मा यशवंत मोहिते ९७.२५% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम .

सावंतवाडी

मुंबई विद्यापीठ अंतर्गत एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष विज्ञान विभागाचा श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा एकूण निकाल १००% लागला.
यामध्ये वनस्पतिशास्त्र विभागाची विद्यार्थिनी कु. करिश्मा यशवंत मोहिते हिने ९७.२५% गुण मिळवून विज्ञान विभागात महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला तर प्राणिशास्त्र विभागाची विद्यार्थिनी कु. अमिषा सगुण सावंत हिने ९७.१२% टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला . तर तृतीय क्रमांक वनस्पती शास्त्र विभागाच्या कु.नंदिनी रणजीत नेमन हिने ९७ % गुण मिळवून पटकावला .

भौतिकशास्त्र विषयाचा निकाल 100% लागला . एकूण २७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते . 23 विद्यार्थी ‘ओ’ श्रेणीमध्ये तर 4 विद्यार्थी ‘ए प्लस’ श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले .संकेत जनार्दन डोरे यांने ८८.८७% गुण मिळवून प्रथम , मलायका मॅक्सी फर्नांडिस हीने ८६.७५% गुण मिळवून द्वितीय तर सेजल माधव पास्ते हिने ८६.५०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला .भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. डी एन पाटील , डॉ वाय ए. चौधरी ,डॉ एस व्ही पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले .
रसायनशास्त्र विषयासाठी एकूण ८५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते यामध्ये 1 विद्यार्थी ओ ग्रेड मध्ये , 35 विद्यार्थी ए प्लस ग्रेड, 42 विद्यार्थी ए ग्रेड, 7 विद्यार्थी बी ग्रेड मध्ये उत्तीर्ण झाले . यामध्ये सिना राजन नाईक हिने ९२.३८% गुण मिळवून रसायनशास्त्र विषयात प्रथम क्रमांक, चैतन्या लहू देसाई हिने ८८.६२% गुण मिळवून द्वितीय तर पुर्वा सुहास बांदेकर हिने ८७.५०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला .रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. जी.एम . शिरोडकर , प्रा. जी.टी यादव, प्रा. एस.एल वैरागे , डॉ डी बी शिंदे ,डॉ. यू सी पाटील ,डॉ वाय ए पवार, डॉ ए पी निकुम यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले .
वनस्पती शास्त्र विभागाचा एकूण निकाल १००% लागला
एकूण 15 विद्यार्थी प्रवेश परीक्षेस प्रविष्ट झाले होते यामध्ये सर्व विद्यार्थी ओ श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले .
करिष्मा यशवंत मोहिते हिने ९७.२५% गुण मिळवून प्रथम क्रमांक ,नंदिनी रणजित नेमन हिने ९७% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर अनिकेत शामसुंदर देसाई याने 93 % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला . वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ यू एल देठे , डॉ व्ही टी अपराध ,डॉ . यू आर पवार यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले .
प्राणिशास्त्र विभागाचा एकूण निकाल १००% लागला .
एकूण १५ विद्यार्थी परिक्षेत प्रविष्ट झाले होते .सर्व विद्यार्थी ओ श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.अमिषा सगुण सावंत हिने ९७.१२% गुण मिळवून प्रथम क्रमांक ,तेजल कृष्णा परब हिने ९६.३७ % गुण मिळवून द्वितीय तर ऐश्वर्या सुभाष टुंबरे
हिने ९४.७५ % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला .प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ सौ पी .पी. सावंत ,प्रा. एस एच महापुरे ,डॉ जी एस मर्गज यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले .
सर्व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले
संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ. शुभदादेवी खेमसावंत भोंसले कार्यकारी विश्वस्त युवराज लखम सावंत भोंसले, संस्थेचे संचालक प्राध्यापक डी टी देसाई , अॅड . श्यामराव सावंत , डॉ. सतीश सावंत ,श्री जयप्रकाश सावंत तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल
सर्व विभागांचे विभागप्रमुख व प्राध्यापकवर्ग यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा