You are currently viewing माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर वाढदिवसानिमित्त  विद्यार्थ्याचा गुणगौरव समारंभ

माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर वाढदिवसानिमित्त  विद्यार्थ्याचा गुणगौरव समारंभ

सावंतवाडी

राजकीय व सामाजिक जीवनात काम करीत असताना मी स्पष्ट वक्ता म्हणून राहिलो. परंतु कोणाचे वाईट केले नाही. त्यामुळे आजही मला रात्रीची चांगली झोप लागले. सावंतवाडीच्या विकासासाठी मी त्यावेळी झटलो. त्यांची अनेक जण आजही पोचपावती देतात. त्यामुळे काम करण्याचा हुरूप येतो, असे मत सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. दिलीप नार्वेकर यांनी सांगितले. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दहावी-बारावीत यश मिळविणार्‍या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी यश संपादन करण्यासाठी मुलांनी कठोर मेहनत करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केेले. श्री.नार्वेकर यांचा वाढदिवस आज संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक तथा संस्थेचे संचालक उमाकांत वारंग, गितेश पोकळे, प्राचार्य बी. डी. पाटील बाळा बोर्डेकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.नार्वेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केले. केवळ कठोर परिश्रम आणि जिद्द याच्या जोरावर आज मी या यापर्यंत पोहाचू शकलो. सावंतवाडीचा नगराध्यक्ष असताना शहराचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून अनेक कामे केली. यानंतर कामे करण्याचा मानस आहे. यावेळी श्री. साळगावकर यांनी नार्वेकर यांना शुभेच्छा दिल्या. नार्वेकर, वारंग आणि मी असे आम्ही तिघांनी एकत्र काम केले आहे. त्यांच्या सोबत काम करताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आजही त्या दोघांची आयुर्वेदिक महाविद्यालय जोमाने चालू राहण्यासाठी सुरू असलेली धडपड वाखाणण्याजोगी आहे.
यावेळी जहान ठाकरे, वैष्णव सावंत, कुमार गावडे आदी अनेक विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश पाटील तर भार्गवराज शिरोडकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 2 =