You are currently viewing मंगळवारी २१ जून ला राजापूर तालुका कॉग्रेसची बैठक

मंगळवारी २१ जून ला राजापूर तालुका कॉग्रेसची बैठक

रत्नागिरी :

 

राजापूर तालुका कॉंग्रेस कमिटीची आढावा बैठक मंगळवारी २१ जून रोजी सकाळी ११ वाजता तालुका काँग्रेस पक्ष कार्यालय, जमिर्स आर्केड राजापूर येथे आयोजीत करण्यात आली आहे.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व राजापूर नगर परिषद निवडणुकांसंदर्भात चर्चा व आढावा, राजापूर अर्बन बँक व अन्य सहकार संस्था निवडणूकांच्या संदर्भात चर्चा व आढावा, आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या संदर्भात चर्चा व आढावा, डिजिटल सभासद नोंदणी व बुथ कमिट्यांच्या संदर्भात आढावा घेण्यात येणार आहे. तसेच कार्यकर्त्यांचे मनोगत व ज्येष्ठांचे मार्गदर्शन, पक्षवाढीसंदर्भात चर्चा केली जाणार आहे.

या बैठकीला राजापूर तालुक्यातील व शहरातील सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, आजी माजी पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ कार्यकर्ते, सल्लागार, तालुक्यातील जिल्हा कार्यकारिणी सदस्य, तालुक्यातील प्रदेश कार्यकारिणी सदस्य, बँकांवर निवडून आलेले पक्षाचे संचालक आदींनी उपस्थीत रहावे,असे आवाहन तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + fifteen =