You are currently viewing सावंतवाडी येथील डिंगणे गाळेल, डोंगरपाल या ठिकाणी वायरमनची कायमस्वरूपी नेमणूक करण्याबाबत मनसेचे सावंतवाडी उपअभियंता यांना निवेदन

सावंतवाडी येथील डिंगणे गाळेल, डोंगरपाल या ठिकाणी वायरमनची कायमस्वरूपी नेमणूक करण्याबाबत मनसेचे सावंतवाडी उपअभियंता यांना निवेदन

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील डिंगणे गाळेल डोंगरपाल या भागात कायमस्वरूपी वायरमनची नेमणूक करण्यात यावी याबाबत मनसेच्या वतीने सावंतवाडी उपविभागीय अभियंता यांना निवेदन सादर करण्यात आले वायरमन नसल्याने येथील गावांना विद्युत पुरवठा च्या अनेक समस्या होत आहेत वारंवार बांदा येथील कनिष्ठ अभियंत्यांकडे तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केला जात आहे त्याबाबत आज मनसेचे बांदा विभागीय अध्यक्ष नाना सावंत मनसेचे डिंगणी ग्रामपंचायत सदस्य आदेश सावंत यांच्या वतीने सावंतवाडी उपअभियंता यांना निवेदन सादर करण्यात आले येत्या आठ दिवसात यावर तोडगा न काढल्यास मनसेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसेचे विभागअध्यक्ष श्री नाना सावंत ग्रा प सदस्य श्री आदेश सावंत यांच्या वतीने देण्यात आला यावेळी सावंतवाडी शहराध्यक्ष अशिष सुभेदार बांदा शहराध्यक्ष बाळा बहिरे संतोष भैरवकर उपशहरअध्यक्ष शुभम सावंत लॉटरीसेना तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर शाखाध्यक्ष निलेश मुळीक सुरेंद्र कोठावळे महाराष्ट्रसैनिक बाबू राउळ मनोज कांबळी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + 13 =