प्रदेश संघटक काका कुडाळकर यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम
सिंधुदुर्ग
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या माध्यमातून येथील कणकवली उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक काका कुडाळकर यांच्या उपस्थितीत रुग्णांना आवश्यक असलेल्या विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, विनोद मर्गज, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल सुद्रिक, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, कणकवली विधानसभा मतदार संघ अध्यक्ष डॉ. अभिनंदन मालंडकर, विधानसभा मतदार संघ युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, युवक राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस सागर वारंग, निखिल गोवेकर, राजेश पाताडे, सखाराम हुंबे, उत्तम तेली, सेनापती सावंत, राजू मेस्त्री, सुजल शेलार, सर्वेश पावस्कर, शंकर चिंदरकर, चंद्रकांत नाईक, आदी उपस्थित होते
यावेळी चादर, सॅनिटाईझर, मास्क अशा वस्तूंचे वाटप करण्यात आले. कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ शिकलगार यांच्याकडे या वस्तू सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक काका कुडाळकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या आदेशानुसार आणि जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस च्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जिल्हाभर विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
तर जिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर म्हणालेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. यानिमित्ताने पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा संपूर्ण सप्ताह विविध कार्यक्रमातून साजरा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.