भटकंती करण्याची आवड हवी….
सावंतवाडी प्रतिनिधी :
वाईल्डलाईफ फोटोग्राफी खर्चिक आहे,ती करायची असेल तर जंगलाचा अभ्यास, पशु पक्षांची प्राथमिक माहिती असली पाहिजे तसेच वेळ व पैसा खर्च करण्याची क्षमता असली तरच वाईल्डलाईफ फोटोग्राफी करता येईल असा विश्वास वाईल्ड कोकणचे अध्यक्ष प्रा. धीरेंद्र होळीकर यांनी व्यक्त केला.
” मी आणि माझी फोटोग्राफी ” या विषयावर वाईल्ड कोकणच्या वन्यजीव सप्ताह निमित्त आयोजित ऑनलाईन वेबीनार प्रा. होळीकर यांनी मांडणी केली.
वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायची असेल तर आर्थिक गुंतवणूक ,वेळ देण्याची तयारी आणि जंगलांची माहिती आवश्यक असते असे प्रा. होळीकर म्हणाले. मी आणि माझ्या मित्रांनी अनेक प्रदेशांमध्ये जाऊन फोटोग्राफी केली आहे. महाराष्ट्र, आसाम, मेघालय, उत्तराखंड, कर्नाटक, गोवा, गुजरात, सिक्कीम, केरळ अशा विविध प्रदेशात जाऊन वाईल्डलाईफ फोटोग्राफी केली असे श्री. होळीकर म्हणाले.
भारतात विविध प्रदेशांमध्ये विविध रंगाचे पशु पक्षी उधळण करतात त्यांची छायाचित्रे टिपण्यासाठी बराच वेळ एकाच ठिकाणी थांबावे लागते या मुळे रपटणार्या प्राण्यांपासून देखील आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे जंगलांचा अभ्यास फारच महत्त्वाचा आहे असे त्यांनी सांगून आजच्या तरुण पिढीला वाईल्डलाईफ फोटोग्राफी करण्याची आवड आहे परंतु वाईल्डलाईफ फोटोग्राफी खर्चिक आहे हे त्यांना माहिती नाही ज्यांच्याकडे पैसा आणि वेळ आहे. तसेच जंगलांचा पशुपक्ष्यांचा अभ्यास आहे अशांनी वाईल्डलाईफ फोटोग्राफी करण्यास हरकत नाही असे होळीकर म्हणाले
भारतात विविध प्रदेशात विविध आकर्षक पशुपक्ष्यांची फोटोग्राफी करता येईल आज असंख्य स्त्री-पुरुष या फोटोग्राफीमध्ये आहेत असे त्यांनी सांगितले ज्यांच्याकडे आर्थिक स्थिती कमकुवत आहे अशांनी पहिले व्यवसाईक फोटोग्राफी करावी व नंतरच वाईल्ड लाईफ फोटोग्राफीकडे वळावे असे देखील ते म्हणाले. वाईल्डलाईफ फोटोग्राफी करताना वेळ आणि पैसा यापेक्षा भटकंती करण्यासाठी देखील वेळ देण्याची आवश्यकता असल्याचे सांगून पशुपक्ष्यांची आणि जंगलांची माहिती असली तरच आपण यशस्वी फोटोग्राफी करू शकतो असे होळीकर म्हणाले
पशुपक्ष्यांच्या फोटोग्राफी वर अनुभव सांगताना ते म्हणाले, तासनतास एकाच ठिकाणी बसावे लागते आणि त्यामुळे पशूं, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या पासूनही आपल्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो त्यासाठी जंगलांची माहिती महत्त्वाची असते असे ते म्हणाले. वाईल्डलाईफ फोटोग्राफी करतानाच भटकंती करावी लागत असल्याने एकटेच जंगलात जाऊन उपयोग होत नाही त्यासाठी आपल्याला सोबतही लागते असे त्यांनी सांगताना देशातील वेगवेगळ्या प्रदेशात आपल्याला आलेल्या अनुभवांची देखील मांडणी प्रा. धीरेंद्र होळीकर यांनी केली
मात्र पशुपक्ष्यांची फोटोग्राफी करताना विलक्षण आनंद मिळतो त्यासाठी आपल्याला जंगलांची भटकंती करण्याची आवड निर्माण करावी लागेल. यावेळी त्यांनी देशातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये टिपलेल्या पशुपक्ष्यांच्या छायाचित्रांची मांडणी करतात अनुभव कथन केले
यावेळी संस्थेचे सचिव डॉ. गणेश मर्गज यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. सुभाष गोवेकर, सुभाष पुराणिक, सतीश लळीत, डॉ. किशोर सुखटणकर, अभिमन्यू लोंढे ,महेंद्र पटेकर,शिवप्रसाद देसाई ,ललीत भट, डॉ शिवप्रसाद केरकर,सुप्रीया मर्गज, विवेक देसाई, अर्जुन सावंत आदींनी सहभाग घेतला.