दोडामार्ग :
दोडामार्ग तालुक्यातील विद्यार्थी तसेच इतर नागरिकांना विविध योजनांसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व दाखले लवकर मिळत नाहीत. कागदपत्रांची पूर्तता करताना विद्यार्थी व नागरिकांची धावाधाव होते. यावर उपाययोजना कराव्यात आवश्यक असल्यास एकाच दिवशी सर्व संबधित अधिकारी कर्मचारी यांना एकत्र आणून कॅम्प भरवुन एकाच ठिकाणी दाखले देण्यात यावेत. या मागणीसाठी युवासेना दोडामार्ग च्या पदाधिकाऱ्यांनी दोडामार्ग तहासिलदार अरुण खानोलकर यांची भेट घेतली व चर्चा केली.
यावेळी या चर्चेतुन सुवर्णमध्य काढत सदर विद्यार्थी व नागरिकांना मदत केंद्रामार्फत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून दाखले मिळावेत. यासाठी प्रयत्न करा, असे तहसीलदार यांनी सांगितले असून दोडामार्ग युवासेना येत्या दोन दिवसात शिवसेना मध्यमावर्ती कार्यालय दोडामार्ग येथे सदरचे “मदत केंद्र” सुरू करणार असल्याचे युवासेना दोडामार्ग तालुकाप्रमुख मदन राणे यांनी सांगितले.
यावेळी युवासेना तालुकाप्रमुख राणे यांसह युवासेना तालुका समन्वयक भगवान गवस, युवासेना विभागप्रमुख शुभम देसाई, युवासेना संघटक संदेश राणे, झोळंबे शाखाप्रमुख सुभाष गवस, आत्माराम नाईक आदी उपस्थित होते.