जिल्हा रुग्णालयाच्या गळतीची कामे तातडीने पुर्ण करावीत:- जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी…

जिल्हा रुग्णालयाच्या गळतीची कामे तातडीने पुर्ण करावीत:- जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी…

आरोग्य यंत्रणेचाही घेतला आढावा…..

कोरोना पार्श्वभुमीवर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेमार्फत व्याधीग्रस्तांचा सर्व्हे….

जिल्हा रुग्णालयामधील इमारतीमध्ये असलेल्या गळतीची त्याचबरोबर इतर कामे बांधकाम विभागाने तातडीने पुर्ण करावीत. असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले.जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी इमारतीच्या विविध विभागांची पाहणी केली. त्याचबरोबर आरोग्य यंत्रणेचाही आढावा घेतला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, शाखा अभियंता व्ही.व्ही. जोशी तसेच आरोग्य विभागाचे डॉक्टर व अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, कोरोना साथ रोगामुळे रुग्णांची संख्या वाढत असून जिल्हा रुग्णालयात रुग्णांना त्रास होवू नये तसेच त्यांच्यावर उपचार करण्याऱ्या सुविधा परिपुर्ण असाव्यात. यासाठी इमारती भक्कम असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयातील ज्या ठिकाणी गळती होत आहे अशा सर्व ठिकाणांची बांधकाम विभागानी पाहणी करुन ती गळती थांबविण्यासाठीची सर्वतोपरी उपाययोजना तातडीने करावी.
यंत्रणेचाही घेतला आढावा यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यामध्ये जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचण्या होत असतात यामध्ये समन्वय राखण्यासाठी तातडीने समन्वय अधिकारी नेमावा. जिल्ह्यात रोज सुमारे 250 कोरोना चाचण्या होत आहेत. यामध्ये आरटीपीसीआर चाचण्या 150 व ॲन्टीजन टेस्टव्दारे सुमारे 100 चाचण्या करण्यात येतात. कोरोना बाधित रुग्णांना जिल्हा रुग्णालयातील आणि कोविड केअर सेंटर मधील रुग्णांना पुरेसा पौष्टीक आहार देण्यावरही भर द्यावा यासाठी निधी कमी पडु दिला जाणार नाही. त्याचबरोबर आरोग्य यंत्रणेनी कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची प्रक्रिया (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) गतीने राबवावी.
कोरोना पार्श्वभुमीवर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेमार्फत व्याधीग्रस्तांचा सर्व्हे,राज्य शासनाने लॉकडाऊनचे बहुतांश निर्बंध उठवल्यामुळे तसेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये यासाठी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून घरोघरी जावून आरोग्य सर्व्हे करण्यात यावा. यामध्ये ह्रदय विकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी, कॅन्सर व इतर गंभीर आजार असणा-या नागरिकांची आरोग्य यंत्रणेने यादी तयार केली आहे. या संबंधित व्यक्तींची रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण (SPO2 Level) आणि इतर रोग लक्षणांची आरोग्य यंत्रणेमार्फंत तपासण्यात करण्यात येणार असून त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा