You are currently viewing अनधिकृत वॉटर स्पोर्ट वर कारवाई होणार

अनधिकृत वॉटर स्पोर्ट वर कारवाई होणार

सावंतवाडी :

सातार्डा, कवठणी तेरेखोल खाडीत अनधिकृत वॉटर स्पोर्ट्स निदर्शनास आल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी, प्रादेशिक बंदर अधिकारी यांच्या आदेशानुसार आज पहाणी करण्यात आली. सातार्डा तलाठी, पोलीस पाटील, बंदर निरीक्षक, किरणपणी, मालवण यांनी संयुक्त पाहणी केली.मात्र वॉटर स्पोर्ट्स बंद असल्याचे निदर्शनास आले. अनधिकृत वॉटर स्पोर्ट्स वरती गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे बंदर अधिकारी यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा