You are currently viewing सिंधुदुर्ग जवाहर नवोदय विद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी ग्लोबल स्टुडंट चॅलेंजमध्‍ये पटकाविले चौथे स्‍थान

सिंधुदुर्ग जवाहर नवोदय विद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी ग्लोबल स्टुडंट चॅलेंजमध्‍ये पटकाविले चौथे स्‍थान

सिंधुदुर्ग

ओटिसच्‍या दुस-या वार्षिक मेड टू मूव्‍ह कम्‍युनिटीज ग्‍लोबल स्‍टुडण्‍ट चॅलेंजमध्‍ये ओटिस इंडियाचे प्रतिनिधित्‍व करणा-या महाराष्‍ट्रातील सिंधुदुर्ग येथील जवाहर नवोदय विद्यालयामधील १० विद्यार्थ्‍यांच्‍या टीमने चौथे स्‍थान पटकावले आणि त्‍यांचा सन्माननीय उल्‍लेख करण्‍यात आला. विद्यार्थ्‍यांनी ओटिस इंडियामधील मेन्‍टोर्सच्‍या टीमच्‍या मार्गदर्शनांतर्गत विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित (एसटीईएम) या विषयांबाबत त्‍यांचे ज्ञान दाखवले आणि भारत, जपान, कोरिया, सिंगापूर व तैवान येथील ओटिस एशिया पॅसिफिक लीडर्ससमोर जगभरातील ज्‍येष्‍ठ नागरिकांची गतीशीलता वाढवणारे संभाव्‍य सोल्‍यूशन सादर केले.

यूएन वर्ल्‍ड पॉप्‍युलेशन प्रॉस्‍पेक्‍ट्स अहवालानुसार २०५० पर्यंत वृद्धांची संख्‍या दुप्‍पट होण्‍याची अपेक्षा असल्‍यामुळे या स्‍पर्धेने वृद्ध व्‍यक्‍तींसाठी गतीशीलता सोल्‍यूशन्‍सवर लक्ष केंद्रित केले.

विद्यार्थ्‍यांनी वृद्धांसाठी व्‍यावहारिका एसटीईएम (STEM ) आधारित बहु-उपयोगी व्‍हीलचेअर कार ‘हमसफर’ची संकल्‍पना सादर केली, ज्‍यामुळे फिरणे, झोपणे, बसणे, उभे राहणे, पाय-या चढणे आणि सर्वोत्तम समाजीकरणासाठी इतरांवर अवलंबून राहणे कमी होईल.

ओटिस इंडियाने २० मे २०२२ रोजी जवाहर नवोदय विद्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित केलेल्‍या कार्यक्रमामध्‍ये विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी ओटिस इंडियाचे अध्‍यक्ष श्री. सेबी जोसेफ, ओटिस इंडियाचे सीनियर लीडरशीप, सीएसआर टीम व मेन्‍टोर्स, जवाहर नवोदय विद्यालयाचे मुख्‍याध्‍यापक व शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्‍यांचे अभिनंदन करत सेबी म्‍हणाले,”मला एसटीईएम शिक्षणाचा लाभ घेत वृद्ध समुदायाच्‍या फायद्यासाठी सोल्‍यूशन सादर करण्‍याची तुमची क्षमता पाहून आनंद झाला आहे. मला खात्री आहे की, हा उत्‍साहवर्धक व गतीशील अध्‍ययन प्रवास होता, जेथे तुम्‍ही पूर्णत: नवीन उत्‍पादन निर्माण करण्‍यासाठी वर्गामध्‍ये मिळालेल्‍या ज्ञानाची प्रत्‍यक्षात अंमलबजावणी केली. तुमच्‍या अध्‍ययनाला सामाजिक गरजांशी संलग्‍न करत अर्थपूर्ण योगदान देता येण्‍याकरिता तुम्‍ही सामाजिक प्रकल्‍पांमध्‍ये सामील होण्‍याची वेळ आली आहे. यामुळे निश्चितच तुम्‍ही देश व जगासाठी भावी विचारवंत बनाल.” जवाहर नवोदय विद्यालयाचे मुख्‍याध्‍यापक श्री. एम. के. जगदीश यांनी त्‍यांच्‍या भाषणामध्‍ये ग्रामीण भागांमधील विद्यार्थ्‍यांना शिक्षण घेण्‍यासोबत स्‍वत:ला जागतिक स्‍पर्धेमध्‍ये सादर करण्‍याकरिता अद्भुत व्‍यासपीठ देण्यासाठी ओटिस इंडियाचे विशेष आभार मानले. ओटिस मेन्‍टोर्सच्‍या नेतृत्‍वासह विद्यार्थ्‍यांनी अनेक ज्ञान आत्‍मसात केले आणि त्‍यांनी मिळवलेल्‍या रँकपेक्षा आमच्‍यासाठी ते अधिक महत्त्वाचे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा