सहकार्याबद्दल अध्यक्ष प्रकाश तेंडुलकर यांनी काढले गौरोउद्गार
सावंतवाडी
सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान ही चळवळ सुरुवातीला सावंतवाडीत उभी राहिली आणि त्यानंतर या प्रतिष्ठानने जिल्ह्यातच नव्हे महाराष्ट्रात सुद्धा मोठे कार्य केले अनेक वेळा प्रतिष्ठानचे रक्तदाते स्वखर्चाने रुग्णापर्यंत पोहोचून त्यांनी अनेकांचे प्राण वाचविले आहेत त्यांचे कार्य हे अनमोल असून त्यांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप म्हणून आणि त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी प्रतिष्ठानच्यावतीने त्यांचा सन्मान करत आहोत असे गौरवोद्गार सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडुलकर यांनी काढले
दरम्यान अतिशय दुर्मिळ असा जिल्ह्यात बॉम्बे रक्तगटाचा पहिला डोनर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही शोधून काढला आणि मालवण येथील पंकज गावडे या बॉम्बे रक्तगटाच्या रक्तदात्याने आंध्र प्रदेशातील एकाचे रक्त देऊन प्राण वाचविले त्यासाठी सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानने प्रयत्न करत विमानाने हे रक्त आंध्रप्रदेशात रवाना केले असेच भरीव कार्य यापुढे करण्याचा आपला मानस असून ही चळवळ यापुढे अधिक वृद्धिंगत करावयाची आहे यासाठी जिल्ह्यातील रक्तदात्यांनी आपले सहकार्य असेच कायम ठेवावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले
जागतिक रक्तदान दिन आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येथील आरपीडी हायस्कूलच्या सभागृहात आयोजित जिल्ह्यातील निवडक रक्तदात्यांच्या व रक्तदान क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते
यावेळी जिल्हा परिषदचे माजी आरोग्य सभापती विकासभाई सावंत, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, प्रतिष्ठानचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सुनील राऊळ, सचिव बाबली गवंडे, विजयकुमार जोशी, महेश राऊळ, अमेय मडक, सुधीर पराडकर, किशोर नाचणोलकर, आनंद वेंगुलेकर, मकरंद सावंत, निलेश मोरजकर, संजय पिळणकर, संजू विरनोडकर, सागर नाणोस्कर, एकनाथ चव्हाण आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संदीप सावंत म्हणाले उपजिल्हा रुग्णालयात महिन्याला दोनशे ते अडीचशे प्रसूती होतात यादरम्यान अनेक रुग्णांना तात्काळ रक्ताची आवश्यकता असते अशा वेळी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे रक्तदाते देवा प्रमाणे धाऊन येतात भविष्यात रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कुठल्याही रुग्णाला तात्काळ रक्ताची आवश्यकता भासल्यास जबाबदार अधिकारी म्हणून “मी” प्रतिष्ठानला हाक दिली तर आपले सहकार्य असेच कायम राहूद्या असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी बोलताना केले
याप्रसंगी आतापर्यंत ३४ वेळा रक्तदान केलेले रक्तदाते तथा पत्रकार सचिन रेडकर तसेच ३३ वेळा रक्तदान करणारे रक्तदाते सागर नाणोस्कर, रक्तदाते हेमंत मराठे, निलेश मोरजकर, शैलेश मयेकर, सिद्धेश शिरोडकर, स्मिता मोर्ये, दिनेश मुळीक,पुंडलिक राऊळ, डॉ. यश पवार, राकेश पार्सेकर, समृद्धी पिळणकर, प्राजक्ता रेडकर,अनिल खंडे,अविनाश पराडकर, साई देसाई, साई सावंत आदींसह जिल्ह्यातील इतर निवडक रक्तदात्यांचा व विशेष करून युवा व महिला रक्तदात्यांचाही सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला
याप्रसंगी बोलताना माजी नगराध्यक्ष संजू परब म्हणाले रक्तदान हे एक श्रेष्ठ दान समजले जाते आणि तुम्ही भाग्यवान आहात की या कार्यात स्वतः म्हणून झोकून घेतला आहात भविष्यात प्रतिष्ठानला कोणतेही सहकार्य लागल्यास मला हक्काने हाक द्या मी तुमच्या कायम सोबत आहे असा शब्द त्यांनी दिला विकासभाई सावंत यांनीही प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव केला सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठाने कोरोना काळात रक्त देऊन अनेकांचे प्राण वाचविले खरंतर या जगातील हेच खरे “रियल हिरो” आहेत कोणतीही प्रसिद्धीची अपेक्षा न बाळगता ते आपलं कार्य अविरत करत असतात त्यामुळे अशा सर्व रक्तदात्यांना आपण सलाम करतो असे त्यांनी सांगितले
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी प्रतिष्ठानचा गौरव करताना सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे कार्य हे अनमोल आहे जिल्ह्यात रक्तदानाची चळवळ वाढविण्यास त्यांचे मोठे योगदान आहे त्यांनी असेच कार्य पुढे सुरु ठेवावे असे आवाहन केले यावेळी सावंतवाडी तालुक्यातील रक्तदान चळवळीतील विविध मंडळांचा तसेच त्यांच्या प्रतिनिधींना व या क्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी रक्तपेढीचे अधिकारी व कर्मचारी यांनाही प्रतिष्ठान तर्फे सन्मानित करण्यात आले सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान चे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडुलकर यांचाही सावंतवाडी तालुका व कणकवली तालुका सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठानच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.