दोन दिवसात उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा – बाप्पा नाटेकर
सावंतवाडी
मळगाव येथे गॅस कंपनीने गॅस पाईपलाईन साठी खोदलेल्या चरामध्ये आज एक वासरू फसले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्या वासराला जीवदान मिळाले. असे अजून किती प्रकार घडणार आहेत असा सवाल सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे पांडुरंग उर्फ बाप्पा नाटेकर यांनी विचारला आहे. येत्या दोन दिवसात जर यावर काही उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही बाप्पा नाटेकर यांनी दिला आहे.