You are currently viewing हवेलीनगर येथे होणारे उद्याचे रस्ता खड्डेमय वृक्षारोपण 15 दिवसांसाठी स्थगित – अजित नाडकर्णी

हवेलीनगर येथे होणारे उद्याचे रस्ता खड्डेमय वृक्षारोपण 15 दिवसांसाठी स्थगित – अजित नाडकर्णी

फोंडाघाट

सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांना रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नोटीस दिली होती. रस्त्याची डागडुजी न झाल्यास बुधवारी 15 रोजी पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात येईल असा इशारा नाडकर्णी यांनी दिला होता. त्यास अनुसरून
कार्यकारी अभियंता श्री शेवाळे, आपले प्रतिनिधी शुभम दुबे (ज्यु. इं.) यांनी पाहणी करून 15 दिवसात रस्ता पावसाळी डांबराने व्यवस्थित करतो असे लेखी पत्र दिल्यामुळे सदरचे वृक्षारोपण पंधरा दिवस स्थगित केले आहे. त्याच प्रमाणे गटारातील माती जी रस्त्यावर आहे ती पण काढून टाकतो असे सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी सह राष्ट्रवादी उपाध्यक्ष अनंत पिळणकर नवीन कुर्ली व हवेली नगर मधील नागरिक उपस्थित होते. अनंत पिळणकर यांनी काल कार्यकारी अभियंता शेवाळे यांची भेट घेतली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा