You are currently viewing नांदगाव ओटव फाटा ब्रिज थांबलेल्या इको कारला अज्ञात वाहनाची धडक; एक गंभीर…

नांदगाव ओटव फाटा ब्रिज थांबलेल्या इको कारला अज्ञात वाहनाची धडक; एक गंभीर…

कणकवली

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच राहिले आहे. आज पहाटे ३ च्या दरम्यान नांदगाव ओटव फाटा ब्रिज वर थांबलेल्या वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात एक गंभीर जखमी असून चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी इको कार नांदगाव ओटव फाटा ब्रिजवर पेट्रोल संपले म्हणून बाजूला थांबली होती. मागाहून येणाऱ्या अज्ञात वाहनाने इकोला जोरदार धडक दिली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून तर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना नांदगाव रुग्णवाहिकेतून व काहींना १०८ रुग्ण वाहीकेमधून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नांदगाव हायवे संदर्भात सर्व्हिस रोडचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही ओटव फाटा ब्रिज जवळील रस्त्याचा प्रश्न सुटला असला तरी नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रोडचा प्रश्न अद्याप जैसे थे आहे. कित्येक अपघात हे सर्व्हिस रोड अभावी होताना दिसत आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते भाई मोरजकर,दिपक मोरजकर संकेत बिडये भुपेश मोरजकर, प्रतिक भाट आदींनी धाव घेऊन मदतकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + 1 =