You are currently viewing कुडाळ ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गैरसोय

कुडाळ ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गैरसोय

कुडाळ :

कुडाळ शहर महिला – बाल रुग्णालय पूर्णतः सुरू झालेले नाही. सध्या रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ, भूलतज्ञ या जागा रिक्त आहेत. काही मशनरी उपलब्ध आहे .पण धूळखात पडलेली आहे. भविष्यात पडून राहिल्यास ती फुकट जाईल. ग्रामीण रुग्णालयात एक्स-रे आणि लॅब टेक्निशन नाही. डॉ. वालावलकर रुग्णालयात असते वेळी महिना ८० ते १५० रुग्णांना सेवा मिळत होती. सध्या फक्त १ किंवा २ एवढेच प्रसूती रुग्ण याचा लाभ घेतात. सर्वसामान्य नागरिकांना नाहक भुर्दंड का ? यावर आमदार, पालकमंत्री गप्प का ? यांची खाजगी डॉक्टरांशी हातमिळवणी आणि लागेबंधे आहेत का ? अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत आहे. त्यामुळे तात्काळ अनुभवी स्रीरोग तज्ञ आणा नाहीतर खुर्च्या खाली करा.

त्याचबरोबर कुडाळ शहराला गेली ७ ते ८ महिने कायमस्वरुपी तलाठी नाही. आज कुडाळ बसस्थानकाची दुर्दशा झालेली आहे. तुटपुंजी शेड, बैठक व्यवस्था नाही. त्याचबरोबर अनेक समस्यांनी सदर नूतन इमारत वेढली गेली आहे. आमच्यासह वृत्तपत्राने देखील या इमारतीचे वाभाडे काढलेले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून बसस्थानक इमारत बांधली त्याचा हिशोब जनतेला आमदार वैभव नाईक यांनी द्यावा.

नाट्यगृहाच्या त्रुटी अद्यापही दूर केल्या गेल्या नाहीत. नाट्यप्रेमी ना बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचे केवळ आश्वासन हवेत विरले. घनकचरा प्रकल्प निर्मूलन प्रकल्प आम्ही ज्या वेळी सत्तेत होतो त्या वेळी करताना कुडाळ, नेरुर, पिंगुळी यामध्ये पडद्यामागून झुंज लावून कणकवलीत बसून मजा बघणाऱ्या आमदारांनी आता शिवसेनेचे मुख्यमंत्री ,उद्योग मंत्री, पालकमंत्री, आमदार कचरा निर्मूलन प्रकल्प कधी करणार ? हे जाहीर करावे.

भविष्यात कुडाळ नवीन बस स्थानक, इमारत गळका बंधारा, नाट्यगृहातील त्रुटी, स्मशान भूमीमध्ये झालेला भ्रष्टाचार. यासारखे प्रकार नगरपंचायत किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून घडल्यास सत्ताधारी म्हणून आमदार, पालकमंत्र्यांना दोषी धरत निश्चित आंदोलने करणार आणि या विरोधात भाजपा गप्प आणि स्वस्थ बसणार नाही, असा हल्लाबोल आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष राकेश कांदे, माजी जि .प .अध्यक्षा सौ. दीपलक्ष्मी पडते, माजी उपनगराध्यक्ष अनंत धडाम, नगरसेविका सौ. प्राजक्ता शिरवलकर, राकेश नेमळेकर, बाळा कुडाळकर, चिटणीस रेवती राणे, विजेन्‍द्र यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा