२२ जूनला होणार कार्यक्रम
कणकवली
शहरातल गडनदी लगत असलेल्या श्रीधर नाईक उद्यानाचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते होणार आहे. २२ जून रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
श्री.नलावडे म्हणाले, महामार्ग चौपदरीकरणात शहरातील श्रीधर नाईक उद्यानाचा काही भाग बाधित झाला होता. त्यांनतर उर्वरीत क्षेत्रात नव्याने उद्यानाची उभारणी करण्यात आली आहे. या उद्यान सुशोभिकरणासाठी शासनाकडे आम्ही ७५ लाख रूपयांच्या निधीची मागणी केली होती. तसा ठरावही नगरपंचायतीच्या माध्यमातून पाठवला होता. या निधीला शासनाने मंजूरी दिली. त्यानंतर गेल्या तीन महिन्यात या उद्यानाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.
उद्यानाचे उद्घाटन करण्याकरिता आम्ही सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींना आमंत्रण दिले आहे. यात पालकमंत्री उदय सामंत यांनी या कार्यक्रमाला येण्याचे मान्य केले आहे. त्यांच्या उपस्थितीत २२ जून रोजी या उद्यानाचे लोकार्पण होईल अशी माहिती श्री.नलावडे यांनी दिली.