मांडकी (औरंगाबाद):
छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचालित कृषी महाविद्यालय कांचनवाडी येथील कृषी विद्यार्थ्यांनी औरंगाबाद तालुक्यातील मांडकी या गावात जाऊन शेतकऱ्यांना कृषी विषयक उपयुक्त मोबाईल ॲपचे प्रशिक्षण दिले. हे विद्यार्थी कृषी पदवीमधील सातव्या सत्रातील ग्रामीण कृषी जागृकता व कृषी उद्योजक संलग्नता या अभ्यासक्रमासाठी मांडकी गावात दाखल झाले आहेत.
कृषीविद्या विभागा अंतर्गत कृषी उत्पादनासाठी मोबाईल ॲपद्वारे माहिती व तंत्रज्ञानाचा वापर. यामध्ये विद्यार्थ्यांनी कृषी विषयक उपयुक्त असे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले एकात्मिक तण नियंत्रण, हळद लागवड तंत्रज्ञान , कापूस लागवड , एकात्मिक कीड व्यवस्थापन यासोबतच ॲग्रोवन, मौसम या मोबाईल ॲपची माहिती दिली.
याबरोबरच मोबाईल ॲपचा वापर कसा करायचा, शेती करत असताना तांत्रिक अडचणी या ॲपद्वारे कशा दूर करायच्या याची सविस्तर माहिती.
यामध्ये अविनाश काळे, शैलेश बोरकर, विजय जगताप , रोहित जाधव, पवन काळे,कमलेश जाधव, संस्कृती पडुळ,ज्योती ठोंबरे , हर्षदा विश्वासू, ऋतुजा वाळके, वैष्णवी शेळके, साक्षी वाघ या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
या प्रशिक्षणासाठी कृषी महाविद्यालयाचे संचालक तथा प्राचार्य डॉ.डि.के शेळके , उपप्राचार्य डॉ. पी.बी बैनाडे, कार्यक्रम समन्वयक प्रा.पी.पी.मुळे तसेच कृषीविद्या विभागाचे विषयतज्ञ डॉ. एस. बी. सातपुते यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ तसेच शेतकरी उपस्थित होते.