सावंतवाडी
येथील कचरा डेपो येथे भले मोठे झाड रस्त्यावर कोसळून आज सकाळी वाहतूक ठप्प झाली होती सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते नासीर पटेल यांनी लगेचच सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, संजय पेडणेकर ,रवी जाधव व अरुण घाडी यांना फोन करून कल्पना देताच रवी जाधव व अरुण घाडी घटनास्थळी तात्काळ दाखल होत सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर व नगर परिषदेचे कर्मचारी यांच्या मदतीने झाड कटर उपलब्ध करून दिला व उपस्थित सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करत खोळंबलेली वाहतूक मार्गस्थ केली.त्यावेळी घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक तेली उपस्थित होते.
याबाबत अधिक वृत्त असे की सावंतवाडी कचरा डेपो रस्त्याच्या बाजूची व शहराच्या आजूबाजूच्या रस्त्या लगतची अजून काही झाडे पूर्णपणे जीर्ण झालेली आहेत तसेच झाडांच्या मुळा खालील माती भुसभुशीत झालेली आहे व अशी झाडे कधीही रस्त्यावर कोसळून मोठी दुर्घटना होण्याची भीती निर्माण झालेली आहे. या संदर्भात उद्या सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते बांधकाम विभागाला धडक देऊन निवेदन देणार असल्याचेही रवी जाधव यांनी यावेळी सांगितले.