पुणे :
मराठी चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ दिग्दर्शक दत्तात्रेय मायाळू तथा राजदत्त यांनी नुकतीच 90 वर्षे पूर्ण केली असून, चित्रपट कारकिर्दीच्या पन्नशिनिमित्त शनिवारी राजदत्त चित्रपट महोत्सव आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन केले असल्याची माहिती फिल्म सोसायटी अध्यक्ष मिलिंद लेले आणि सचिव आमोद खळदकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे सभागृहात शनिवारी 11 रोजी या महोत्सवाला सुरुवात होणार आहे. उद्घाटन माजी खासदार विनय सहस्त्रबुध्दे यांच्या हस्ते होणार आहे.
राजदत्त यांना ICCR चे अध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच दिग्दर्शक राजदत्त यांच्या चित्रपटांमधे काम केलेले कलाकार आणि तंत्रज्ञ यावेळी आवर्जून उपस्थित राहणार आहेत. NFAI थिएटर, लॉ कॉलेज रोड येथे हा महोत्सव होईल स. 10 वा उद्घाटन व स्वागत, स. 10.15 वा. चित्रपट – पुढचं पाऊल दु. 2 वा. चित्रपट – वऱ्हाडी आणि वाजंत्री, सायं. 5.30 वा. राजदत्त यांची मुलाखत – आणि सन्मान सोहळा असा कार्यक्रम आहे.
दि. 12 जून रविवार स. 10 वा चित्रपट हा शापित हा वेठबिगारी सारख्या सामाजिक प्रश्नाला वाचा फोडणारा चित्रपट प्रदर्शित होईल, असे मिती फिल्म सोसायटीच्या वतीने कळविण्यात आले.