कोल्हापूरच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक विस्कळीत
फोंडाघाट :
फोंडाघाट बस स्टँडच्या वरील उतारावर दोन कंटेनरट्रकची शनिवार ११ जून रोजी सकाळी ६.४५ वा. च्या दरम्यान समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाला. यामुळे कणकवलीहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली होती.
सकाळीच झालेल्या अपघातामध्ये कोल्हापूरच्या दिशेने भंगार घेऊन जाणारा कंटेनरट्रक (एनएल०१ एबी ५८३७) व कणकवली वरून गोवाला पॅकिंग पॉलिथिन मटेरियल घेऊन जाणारा कंटेनरट्रक (आरजे११ जीसी ०४२१) यांची फोंडाघाट बसस्थानकच्या वरील उतारावर समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही ट्रकचे एक्सेल पार्ट तुटल्याने पुढील दोन ते तीन तास वाहतूक मोकळी होण्याची शक्यता नसल्याने सकाळीच कामावर जाणाऱ्यांचा मोठा खोळंबा झाला आहे.