मराठी एकीकरण समितीची इचलकरंजी नगरपरिषदेकडे मागणी
इचलकरंजी शहर परिसरात अत्याधुनिक यंञमाग उद्योग झपाट्याने वाढत असून यासाठी कुशल कामगारांची मोठी मागणी वाढत आहे.याचा विचार करुन इचलकरंजी नगरपरिषदेने महिला सबलीकरण प्रशिक्षण उपक्रमातंर्गत स्थानिक महिलांना मोफत अत्याधुनिक यंञमाग प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करुन त्यांना रोजगारातून आर्थिक स्वावलंबी करावे ,अशी मागणी मराठी एकीकरण समितीच्या वतीने नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.प्रदीप ठेंगल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.तसेच याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
शेती खालोखाल सर्वाधिक रोजगार देणारा उद्योग म्हणून यंञमाग उद्योगाकडे पाहिले जाते.या उद्योगाशी निगडीत उद्योगांमुळे देखील अनेक रिकाम्या हातांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.गेल्या काही वर्षांत इचलकरंजी शहर परिसरात अत्याधुनिक यंञमाग झपाट्याने वाढत आहे.पण , त्यामानाने या उद्योगासाठी आवश्यक असणा-या कुशल कामगारांची मोठी उणीव भासत असून मोठी मागणी वाढत आहे.सध्या इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने महिला सबलीकरण उपक्रमांतर्गत महिलांसाठी विविध व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येत आहे.यासाठी नगरपरिषद प्रशासनाने चालू वर्षीच्या अर्थसंकल्पात सुमारे ४० ते ५० लाख रुपयांची तरतूद केल्याचे समजते.पण ,असे असूनही नगरपरिषदेने महिलांना सर्वाधिक प्रमाणात रोजगार मिळण्याची संधी असलेल्या अत्याधुनिक यंञमाग प्रशिक्षण देण्याची कोणतीही व्यवस्था केली नसल्याचे दिसत आहे.याच अनुषंगाने आज गुरुवारी मराठी एकीकरण समितीच्या वतीने नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.प्रदीप ठेंगल यांच्याकडे निवेदन सादर करुन नगरपरिषदेने महिला सबलीकरण प्रशिक्षण उपक्रमातंर्गत स्थानिक महिलांना मोफत अत्याधुनिक यंञमाग प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करुन त्यांना रोजगारातून आर्थिक स्वावलंबी करावे ,अशी मागणी केली आहे.तसेच याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी मराठी एकीकरण समितीचे जिल्हाध्यक्ष अमित कुंभार , गणेश शिंदे ,प्रशांत जाधव , विशाल माळी , मुकेश दायमा , विश्वनाथ व्हनबत्ते , बाळकृष्ण धुपदाळे यांच्यासह अन्य उपस्थित होते.