You are currently viewing उद्या कुडाळात उद्योजकता विकास परिषद

उद्या कुडाळात उद्योजकता विकास परिषद

कुडाळ :

कोकण विभागात विभागातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी उद्योग व्यवसाय करण्याकरिता प्रोत्साहन देण्याच्या हेतूने १० जून रोजी दुपारी ३ वाजता येथील महालक्ष्मी सभागृह येथे उद्योजकता विकास परिषद आयोजित केल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे सरव्यवस्थापक सागर नागरे यांनी दिली.

महिलांना व्यापार -उद्योग सुरू करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देणे ,प्रकल्प उभारणीसाठी तांत्रिक मार्गदर्शनापासून अर्थसहाय्य, व विक्री व्यवस्था उभारण्यात सहकार्य करणे, महिलांच्या उद्योगासाठी जागा उपलब्ध करून देणे, महिलांना उपलब्ध कौशल्य प्रशिक्षणाच्या योजना याबाबत मार्गदर्शन केले जाणार असून महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, महिला उद्योजकता समितीच्या चेअरपर्सन संगीता पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.

महाराष्ट्र चेंबरचे २०२२-२७ कालावधीसाठीचे महिला उद्योजकता धोरण तयार केले असून या धोरणापासून कोकणसाठी काय मिळेल, याची घोषणा या परिषदेत केली जाणार आहे.

महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दशरथी, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी , जिल्हा ग्रामीण यंत्रणा (सिंधुदुर्ग) चे प्रकल्प संचालक राजेंद्र पराडकर ,महिला समितीच्या उपाध्यक्षा कविता देशमुख यांच्यासह विविध मान्यवर या परिषदेस उपस्थित राहणार असून चेंबरचे कोकण विभागाचे उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर ,ट्रस्ट बोर्डचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, गव्हर्निंग काऊन्सिलचे सदस्य श्रीकृष्ण परब, भालचंद्र राऊत ,अशोक सारंग, महेश मांजरेकर ,मनोज वालावलकर या परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × three =