You are currently viewing तुळस ग्रामपंचायत कार्यालयास केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट

तुळस ग्रामपंचायत कार्यालयास केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट

वेंगुर्ला (तुळस) :

 

केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावच्या प्रसिद्ध जैतीर उस्तवास भेट देण्यासाठी आले होते. दरम्यान त्यांनी तुळस ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली.

यावेळी सरपंच शंकर घारे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, सिंधुदुर्ग बॅंकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा मुंबई उपाध्यक्ष मिलिंद तुळसकर, जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, किसान मोर्चा चे बाळु प्रभु, ता.उपाध्यक्ष संतोष गावडे, कोकण विकास आघाडीचे सुभाष आरोसकर, जैतीर देवस्थान कमीटी सचीव विजय रेडकर, ता.चिटणीस समीर कुडाळकर, शक्ती केंद्र प्रमुख कमलेश गावडे, बुथ प्रमुख विनय गोरे, युवा मोर्चाचे नारायण कुंभार, महिला मंडळाच्या सुजाता पडवळ, माजी उपसरपंच जयवंत तुळसकर, ग्रा.पं.सदस्य शेखर तुळसकर, बुथप्रमुख संदीप बेहरे, ग्रा. पं.सदस्या शितल नाईक, सचिन नाईक, भाऊ महाजन इत्यादी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा