You are currently viewing खारेपाटण बाजारपेठ तब्बल आठ दिवसानंतर सुरू…

खारेपाटण बाजारपेठ तब्बल आठ दिवसानंतर सुरू…

बाजारपेठेत गर्दी वाढल्याने तातडीने पोलिसांनी बंद केली दुकाने

खारेपाटण :

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या कणकवली तालुक्यातील खारेपाटण बाजारपेठ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दि​ ​​२२ एप्रिल पासून दि.​२९ एप्रिल पर्यंत सलग आठ दिवस बंद ठेवण्यात आली होती. आज शुक्रवारी खारेपाटण बाजारपेठ संपूर्ण उघडण्यात आली होती. परंतु बाजारपेठेत ग्राहकांची अचानक गर्दी वाढू लागल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येताच सकाळी​ ११.​०० नंतर पोलिसांनी कार्यवाही करत खारेपाटण बाजारपेठ पूर्णतः बंद केली​.  ​दरम्यान गेल्या आठ दिवसाच्या बंद नंतर खारेपाटण मधील व्यापाऱ्यानी आज शुक्रवारी ​३० एप्रिल ला बाजारपेठ उघडली होती. कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने खारेपाटण व्यापारी व स्थानिक नागरिक यांच्या सहकार्याने खारेपाटण ग्राम सनियंत्रण समितीने एकमुखी निर्णय घेऊन खारेपाटण बाजारपेठ बंद ठेऊन प्रशासनाला सहकार्य केले होते. मात्र खारेपाटण बाजारपेठे आज सकाळपासून नागरिक व ग्राहकांनी एकच गर्दी केली होती. ही परिस्तिथी लक्षात येताच खारेपाटण चरक पोस्ट पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे यांनी तातडीने खारेपाटण बाजारपेठेत जाऊन गर्दी नियंत्रणात आणून ध्वनिक्षेपक द्वारे नागरिकांना व व्यापाऱ्यांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करून खारेपाटण बाजारपेठ सकाळी ​११​.​००​ नंतर अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णतःहा बंद केली. यावेळी त्यांच्या समवेत खारेपाटण दुरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी सुयोग पोकळे, योगेश राऊळ, राकेश चव्हाण आदींनी खारेपाटण बाजारपेठेत पोर्टलिंग करून बाजारपेठ बंद ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांनी सांगितले.​ ​सकाळी​.​​११. ३० नंतर बाजारपेठेत पुर्णतः शुकशुकाट पसरला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − eight =