साक्षी सबनीस, साई निंब्रे, अपर्णा नाईक यांनी मारली बाजी
सावंतवाडी
राजमाता सत्वशीलादेवी भोंसले कनिष्ठ महाविद्यालय कला वाणिज्य विज्ञान शाखेतून 290 विद्यार्थ्यांपैकी 284 विद्यार्थी उत्तीर्ण होत महाविद्यालयाचा 97.93% निकाल लागला.
कला शाखेत प्रथम साक्षी नागेश सबनिस 90.83%, द्वितीय सानिया समीर भाट 88% तृतीय दरोती जॉर्जी गोम्स 85.50,
वाणिज्य शाखेत प्रथम साई रवींद्र निब्रे 89.83, द्वितीय वेदांत दत्तप्रसाद मसुरकर 85.00, तृतीय सोहम अनिल साळगावकर 84.00 ,
विज्ञान शाखेत प्रथम अपर्णा भिमसेन नाईक 89.33, द्वितीय रुद्रेश रविंद्र सावंत 87.50, मिताली रत्नाकर नाईक 80.50% गुण मिळविले.
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजमाता सत्वशिलादेवी भोसले कनिष्ठ महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हिज हायनेस खेमसावंत भोंसले आणि संस्थेचे चेअरमन श्रीमंत हर हायनेस सौ. शुभदादेवी खेमसावंत भोंसले यांनी अभिनंदन केले.
यावेळी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखम सावंत भोसले, विश्वस्त श्रद्धाराजे सावंत भोंसले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. व्ही.पी. राठोड आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.