You are currently viewing कळसुलकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल १०० टक्के

कळसुलकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल १०० टक्के

परिणीती टिपणीस हिने पटकाविला प्रथम क्रमांक

सावंतवाडी

कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी या प्रशालेचा बारावीचा निकाल 100 टक्के लागला असून कला विभागात परिणीती राहुल टिपणीस हिने ७५.१७ टक्कांसह प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर द्वितीय क्रमांक श्रेया संतोष भानसे ६७.०० टक्के तर तृतीय क्रमांक क्रमांक मयुरी रमेश जाधव ६६.३३ टक्के प्राप्त केले आहेत.

तर वाणिज्य विभागात दिपाली सुरेश म्हालटकर ६२.३३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर द्वितीय क्रमांक आंकाक्षा आनंद मळेकर ६२.१७ टक्के तर तृतीय क्रमांक आसावरी विठ्ठल गवंडे ६१.६७ टक्के प्राप्त केले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा