You are currently viewing उमेद अभियानातर्फे राज्यस्तरीय लघुपट व माहितीपट स्पर्धेचे आयोजन

उमेद अभियानातर्फे राज्यस्तरीय लघुपट व माहितीपट स्पर्धेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांच्या यशोगाथा दृकश्राव्य स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने राज्यस्तरीय लघूपट व माहितीपट आणि चित्रफित निर्मितीच्या स्पर्धेचे आयोजन 1 जून ते 30 जून 2022 या कालावधीमध्ये करण्यात आलेले आहे. स्पर्धा सर्वासाठी खुली असल्याने या स्पर्धेसाठी व्यावसायिक, हौशी चित्रपट निर्माते, व्हिडीओ निर्माते व युट्युब ब्लॉगर यांना सहभागी होता येणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणचे प्रकल्प संचालक यांनी दिली आहे.

          राज्यस्तरावर निवड होणाऱ्या स्पर्धकांसाठी प्रथम पारितोषिक 3 लाख रुपये,सन्माचिन्ह व प्रमाणपत्र, व्दितीय पारितोषिक 2 लाख रुपये, सन्माचिन्ह व प्रमाणपत्र, तृतिय पारितोषिक 1 लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र व उत्तेजनार्थ 50 हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रात सन 2011 पासून INTENSIVE पध्दतीने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद या नावाने अंमलबजावणी केली जात असून महिला स्वयंसहायता समूहांच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न वाढीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. या माध्यमातून अनेक गरीब कुटुंबाच्या जीवनमानात फरक पडला आहे. या यशोगाथांना दृकश्राव्य माध्यमातून चित्रित करण्यासाठी राज्यस्तरीय लघुपट, माहितीपट आणि चित्रफित निर्मिती स्पर्धा 1 जून ते 30 जून 2022 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. चित्रफित जिल्हास्तरावर सादर करण्याची शेवटची दिनांक 15 जून पर्यंत, अंतिम निवड प्रक्रिया पार पडेल. चित्रिफितीची वेळे जास्तीत जास्त 7 मिनिट असावी. चित्रीकरणाचा दर्जा उच्चतम असावा किमान HD मध्ये चित्रिकरण असावे. लघुपट मिनिती करण्यासाठी व्यावसायीक निर्माते, हौशी चित्रफित निर्माते,युट्युब ब्लॉगर, सवयंसहायता समूह, ग्रामसंघ, प्रभागसंघ, ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, राज्याचा कोणीही नागरिक हे सर्वजन स्पर्धक म्हणून सहभागी होऊ शकतील. स्पर्धेचे विषय, नियम, प्रवेश अर्ज व इतर माहितीसाठी इच्छुकांनी MSRLM अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष,सिंधुदुर्ग व तालूका अभियान व्यवस्थापन कक्ष-सर्व तालूके येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

          या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्यासाठीचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा