सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल ३० पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती देण्यात आली आहे.यात सावंतवाडी पोलीस ठाण्यातील बाबू उर्फ आत्माराम तेली यांच्यासमवेत राजलक्ष्मी राणे,गुरुनाथ भागवत,शरद लोहकरे,सदानंद साळुंखे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. लवकरच त्यांना जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात येणार आहे.
याबाबतचे पत्र पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिले.निवड झालेल्या पोलीस अधिकार्यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. यात निसार तडवी, ज्ञानदेव गवारी,बापू खरात, अंकुश कोचरेकर,भालचंद्र शिंगाडे, सतीश कदम, संतोष गोसावी,विनायक चव्हाण,दशरथ चव्हाण,संदीप पडेलकर, रामचंद्र शेळके, रामचंद्र गोसावी, गजानन चव्हाण,तुळशीदास सोनवणे, काळूराम तेरसे,मोहन चव्हाण, सुधीर कदम,अजित कदम, गुरुनाथ भागवत,शेखर दाभोलकर,अविनाश कदम, रवींद्र कदम,आनंद नाईक, तुकाराम जाधव, रवींद्र जाधव, प्रवीण माने, नितीन कदम,सत्यवान सावंत,आदी पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.