जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ प्रतिभा हरणखेडकर यांची अप्रतिम काव्यरचना
एक पाखरू वेल्हाळ
उडे स्वच्छंद आपलं
गडगडाटानं भ्यालं
घरट्यात ते लपलं
गेला पाऊस पडून
झा लं निरभ्र आकाश
सूर्य लागला चमकू
दिसे सर्वत्र प्रकाश
आलं हळूच बाहेर
घेई चाहूल दमानं
ओली हवा साद देई
शीळ घातली वा-यानं
भीड चेप ली पाखराची
अन आलं ते खुशीत
अंग झाडीत ओलेते
गाणे घेऊन चोचीत
गात सुटले स्वच्छंदी
भीड पळाली कुठेशी
झेप घेतली मजेत
खुल्या मोकळ्या आकाशी
घेत सुरांची वेलांटी
गाणे रेखीले एकांती
सखे येताच सोबती
मस्त मारली कोलांटी
गोफ विणला सा-यांनी
आरसपानी आसमंती
फुले गुलाब मोगरा
जाई जुई नी वासंती
गंधाळली सारी सृष्टी
रंग फेकले प्राचीने
त्याच रंगात रंगली
सारी पाखरे मजेने
डॉ. प्रतिभा हरणखेडकर
जळगाव