सिंधुदुर्गनगरी :
कुडाळ शहरात कविलकाटे, मयेकरवाडी, घर नं. 2374 दिनांक 9 ऑक्टोबर 2020 पर्यंत, कुडाळ-सांगिर्डे, श्रीरामवाडी, पशुरत्न कॉम्प्लेक्स, कोरोना बाधित यांच्या राहत्या रुमचा भाग दिनांक 12 ऑक्टोबर 2020 पर्यंत, कुडाळ, हिंदू कॉलनी, भास्कर अपार्टमेंट, बी, विंग, दूसरा मजला, घर नं. 5275 दिनांक 13 ऑक्टोबर 2020 पर्यंत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
कुडाळ तालुक्यात कुपवडे, फौजदारवाडी, घर नं. 566 च्या 50 मीटर परिघामध्ये दिनांक 10 ऑक्टोबर 2020 पर्यंत, ओरोस, बामणवाडी घर नं. 1557 च्या 50 मीटर परिघामध्ये, ओरोस प्राधिकरण, अमोल अपार्टमेंट, एस-1, दिनांक 12 ऑक्टोबर 2020 पर्यंत, रानबांबुळी, पोलीस कॉलनी, बी-10, रुम नं. 11 दिनांक 13 ऑक्टोबर 2020 पर्यंत, ओरोस प्राधिकरण, पंचशिल इमारत, पहिला मजला, रुम नं. 2 दिनांक 14 ऑक्टोबर 2020 पर्यंत, पिंगुळी- देऊळगाव, देवऊळवाडी, घर नं. 304 च्या 50 मीटर परिघामध्ये, पिंगुळी- गोंधळपूर, खंबीरवाडी, घर नं. 403 च्या 50 मीटर परिघामध्ये, वाडीवरवडे, भद्रकालीवाडी घर नं. 20 च्या 50 मीटर परिघामध्ये, बिबवणे, नाईकवाडी, घर नं. 236, दिनांक 15 ऑक्टोबर 2020 पर्यंत,कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोन संबंधित दिनांकापर्यंत रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कुडाळच्या उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे यांनी दिले आहेत.