You are currently viewing छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरण न झाल्यास उपोषण…

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरण न झाल्यास उपोषण…

कणकवली शहर भाजपाचा प्रांताधिकार्‍यांना इशारा

कणकवली

शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 अंतर्गत सर्विस रस्त्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येत्या आठ दिवसात स्थलांतर न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा शहर भाजपने दिला आहे.
कणकवली शहर भाजपच्या वतीने आज प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले यात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थलांतर करण्याबाबत पालकमंत्री यांनी आश्वासन दिले होते. या संदर्भात त्यांनी कणकवली नगरपंचायत येथे बैठक घेऊन यावर चर्चा करत एक महिन्यामध्ये यावर योग्य तोडगा काढून, त्यानंतर पुतळा स्थलांतरित करण्यात येईल असे सांगित होते. मात्र अद्याप पुतळ्याचे स्थलांतरण झाले नसल्याने कणकवली शहर भाजपच्या वतीने उपोषणा शिवाय अन्य कोणताही मार्ग शिल्लक राहिलेला नाही.
छत्रपतींच्या पुतळ्यासाठी नगरपंचायतने जागाही उपलब्ध करून दिली होती. असे असताना जून महिना आला तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित करण्यात आलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाच्या आजूबाजूला अपघात घडत असून, येत्या आठ दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतर करण्याची कार्यवाही न झाल्यास १५ जून पासून सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी , लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाच्या समोरील जागेत बेमुदत उपोषणास बसणार आहोत. असा इशारा कणकवली शहर भाजपाच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, शक्ती केंद्रप्रमुख महेश सावंत, भाजपा महिला शहराध्यक्ष प्राची कर्पे, नगरसेवक शिशीर परुळेकर, सागर राणे, संजय ठाकूर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा