You are currently viewing कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर येथील रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात

कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर येथील रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात

मळगाव

कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर येथील रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.दिवाकर राऊळ,प्रमुख उपस्थिती दुर्गसेवक सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुनील राऊळ,सेवानिवृत्त कामगार अधिकारी शेखर पाडगावकर, वाचनमंदिरचे अध्यक्ष हेमंत खानोलकर,उपाध्यक्ष बाबली नार्वेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले,त्यानंतर वाचनालयात असलेल्या शिवाजी महाराज्यांवरील पुस्तकाच्या पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन ही करण्यात आले.
आपल्या धर्माबरोबर इतर धर्माच्या लोकांशी सलोखा राखण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले.शिवाजी राज्यानी जात- धर्म या पलीकडे सुराज्य निर्माण केले.या सर्वाचा आदर्श आजच्या प्रत्येक माणसाने डोळ्यासमोर ठेऊन कार्य केले पाहिजे,असे विचार प्रमुख अतिथी श्री.राऊळ यांनी मांडले.
श्री.पाडगावकर यांनी शिवरायांचा जीवनपट प्रेक्षकासमोर मांडला, दुर्गसेवक सुनील राऊळ करीत असलेले कार्य खूप मोलाचे आहे.त्याला समाजातील लोकांनी प्रोत्साहन देऊन दुर्गसवर्धन करण्यास मदत केली पाहिजे असे श्री.पाडगावकर म्हणाले.
दुर्ग सेवक श्री.राऊळ यांनी शिवरायांनी बांधलेले किल्ले याचे संवर्धन करावयाचे असून ते तरुण पिढी जोमाने करीत आहे,याचा अभिमान आम्हाला आहे.यासाठी तुमच्या पाठींब्याची आवश्यक ता आहे,असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष श्री.खानोलकर यांनी आपल्या प्रास्ताविकात वाचनालयाच्या कार्यक्रमाची माहिती विषद करून सर्व वाचक,हितचिकानी या वाचनालयाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले.यापुढे वाचनालय विध्यार्थी वर्गाबरोबर शेतकरी,महिला,वयोवृद्ध लोकांसाठी निरनिराळे उपक्रम राबविणार आहे.
यावेळी रेश्मा शिरोडकर व निधी राऊळ यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी हा पोवाडा सुंदर रीतीने सादर केला,तर पूर्व चांदोरकर हिने माता जिजाऊ यांची शिवरायांच्या प्रति असणारी भूमिका सादर केली,वाचनालयाच्या संचालिका सौ.स्नेहा खानोलकर यांनी शिवरायांचा जीवनप्रवास मांडला.
श्री.पाडगावकर यांनी पोवाडा गायलेल्या मुलींना रोख रक्कम देऊन गौरव केला,तर नूतन बांदेकर गोवेकर यांनी मुलांसाठी खाऊ दिला.
या कार्यक्रमास शिवप्रेमी,वाचक,सभासद,विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पृथ्वीराज बांदेकर,आभार गुरुनाथ नार्वेकर यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाचनमंदिर चे संचालक मंडळ व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा