You are currently viewing लावणी

लावणी

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रो. डॉ. प्रवीण जोशी यांची अप्रतिम लावणी

राजसा अलाया लै दिसा
ऐसपैस बस गुलगुलु हसा
चार इष्का च्या गोष्टी सुनवा
राया मला तुमच्या बुलेटवरून फिरवा ।। ध्रु ।।

लै दिसांनी आलीया स्वारी
खमंग खावा की शिरा पुरी
देते थंड लस्सी बी वरी
तुम्हा मिळेल तेवढाच गारवा ।। 1।।

उन्ह चढलंय माथ्यावरी
घ्या इथेच जरा विश्रांती
विडा करून देते श्रीमंती
माझ्या पदराचा रंग ओला हिरवा ।। 2।।

विडा रंगलाय ह्यो प्रेमाचा
माझ्या गुलाबी टच्च ज्वानीचा
वखुत आलाय इष्का चा
तुमच्या बुलेटची गती जरा वाढवा ।। 3।।

ह्या गाडीची तऱ्हा लै न्यारी
हेच रंग रुपडं लै भारी
राजबिंडा दिसती स्वारी
घाटा घाटा न गाडी वर चढवा ।। 4।।

लै दिसात खुष ही सवारी
डबलसीट जाऊ कोल्हापुरी
रंकाळा वर खाऊ पाणी पुरी
मला पन्हाळ्याचा गड तुम्ही दाखवा ।। 5 ।।

नथ घालते मी चाफेकळी
तंग अंगावरची चोळी
अफूवानी इष्का ची गोळी
शालु नसते मी जरतारी हिरवा ।। 6 ।।

कोरस
राय हिला तुमच्या बुलेटवरून फिरवा

प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
नसलापुर / बेळगांव
कॉपी राईट 15 एप्रिल 2021

प्रतिक्रिया व्यक्त करा