You are currently viewing संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांचा वाढदिवस मुंबईत साजरा

संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांचा वाढदिवस मुंबईत साजरा

*आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती*

 

मुंबई :

मुंबई – ताडदेव येथे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांचा वाढदिवस आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आ. वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन केक भरवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी अरुणभाई दुधवडकर यांच्या पत्नी अरुंधती दुधवडकर, उद्योजक प्रशांत पोकळे, उद्योजक स्वरूप कदम, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, सन्मेश परब आदींसह अरुण दुधवडकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × one =