जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी प्रवीण खोलंबे यांची जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने लिहिलेली कविता
शालु हिरवा होता पांघरलेला,
ह्या वसुंधरेच्या अंगावरती,
सिमेंट काॅंक्रेट वाल्यांनी,
अशी नांगरली ही धरती ||१||
निसर्गावर होती मानवाची,
एकेकाळी जिवापाड माया,
रस्ते ,सिमेंट ,काॅंक्रेटीकरण,
शहरीकरणा,मुळे गेली वाया ||२||
अशा गर्द हिरव्या जंगलात,
झाडं तोडुन,प्राणी मारुन,
स्वतःच्या स्वार्थापायी,
घेती पोटाचे खळगे भरुन ||३||
ह्या घनदाट जंगलामधी,
पक्षी गाती मंजुळ गाणी,
येत होता किलबिल आवाज ,
वाहत होते खळखळ पाणी ||४||
झाडे तोडली,वृक्ष मारली,
पर्यावरणाचा नाश केला,
श्वास घेण्यास माणसा ,
आता प्राणवायु नाही उरला ||५||
पाणी आडवा, पाणी जिरवा,
विचार पुढचा नवी संकल्पना,
नका करू पाण्याची नासाडी,
आता विचार अंमलात आणा ||६||
कवी प्रविण खोलंबे.
ता, मुरबाड ,जि.ठाणे.
मो.८३२९१६४९६१