You are currently viewing नांदेड येथील कार्यक्रमात सिंधुदुर्गच्या पूजा कदम हिच्या कलाकृतींचे प्रदर्शन

नांदेड येथील कार्यक्रमात सिंधुदुर्गच्या पूजा कदम हिच्या कलाकृतींचे प्रदर्शन

कणकवली

नांदेड येथे झालेल्या ‘ब्लू प्राईड कर्निव्हल २०२२’ या कार्यक्रमात कणकवली तालुक्यातील पियाळी येथील प्रतिथयश युवा चित्रकार पूजा कदम हिच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. पूजाच्या कलाकृतींचे जग, देशभरातील मान्यवरांसह उपस्थितांनीही कौतुक केले.

दलित पँथर संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नांदेड येथील शंकरराव चव्हाण सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पूजा हिने रेखाटलेली स्केच , स्टोनआर्ट , स्टिंगआर्ट , बॉटलआर्ट अशा विविध प्रकारांचा समावेश होता. विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्टिंगआर्ट सर्वांना भावले . कार्यक्रमाला अमेरिका येथील हेन्री गॅडिस, मायकल मॅकार्टी, प्रा. जोकोबी विलियम्स , जेएनयू विद्यापिठाचे राहुल सोनपिंपळे, आजाद समाज पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आजाद, इंदिरा आठवले, रॅपर विपीन तातड़ व माही, चित्रकार कैलास खानजोडे, व्हिज्युअल डिझायनर सिद्धेश गौतम, शाहीर चरण जाधव, सचिन डांगळे, अतुल खरात, नितीन चंदनशिवे आदींचा समावेश होता. या सर्वांच्या कौतुकाने आपण भारावून गेल्याच पूजा हिने सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा