सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाच्या सदस्या श्रीमती. सुप्रदा प्रकाश फातर्पेकर या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून दिनाक 6 जून 2022 रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय व पोलीस अधिक्षक कार्यालय येथे भेट देऊन महिला योजना व प्रकरणांचा आढावा घेणार आहेत. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथील जुने नियोजन सभागृह येथे तसेच दुपारी 3 वाजता पोलीस अधिक्षक कार्यालय येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी.जी.काटकर यांनी दिली.