You are currently viewing बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ येथे जागतिक सायकल डे साजरा

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ येथे जागतिक सायकल डे साजरा

कुडाळ :

बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळच्या वतीने ३ जून रोजी विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी सायकल चालवण्या सारखा व्यायाम नाही, हे लक्षात घेऊन “जागतिक सायकल डे” मोठ्या उत्साहात साजरा झाला. या दिनानिमित्त बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल मधील ८ वी ते दहावी व बॅरिस्टर नाथ पै आर्टस, र्कॉमस् आणि विज्ञान ज्युनिअर काॅलेज मधील २५ विद्यार्थ्यांनी सायकल रॅलीत सहभाग नोंदविला. पिंगुळी व एमआयडीसी भागात ही सायकल फेरी काढण्यात आली.

या उपक्रमाला चेअरमन उमेश गाळवणकर, प्राचार्या यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्राचार्य शुभांगी लोकरे, एन सी सी.सी. टी. ओ. नचिकेत देसाई,सी. टी. ओ. (Ncc)यशश्री प्रभूखानोलकर आदी उपस्थित होते. या सायकल फेरी ने बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल परिसर,पिंगुळी, एमआयडीसी भागात १० किलोमीटर अंतर पार करत वाढत्या इंधन समस्येवर मात करण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी सायकल वरून प्रवास किती लाभदायक ठरतो याचा संदेश दिला.या उपक्रमाबद्दल ग्रामस्थ, पालकवर्ग यांनी समाधान व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − seven =