पदाधिकाऱ्यांकडून केंद्र सरकारच्या भोंगळ कारभाराचा समाचार
संपूर्ण देशभरात एकूणच वाढलेल्या महागाईच्या विरोधात इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील कृष्णानगर येथून जनजागरण अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.यावेळी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून जनतेला महागाईचा झटका देणा-या केंद्र सरकारच्या भोंगळ कारभाराचा समाचार घेण्यात आला.
केंद्र सरकारचा भोंगळ कारभार व चुकीच्या धोरणामुळे
पेट्रोल – डिझेल , घरगुती गॅस सिलिंडर व जीवनावश्यक वस्तूंच्या दरात भरमसाठ वाढ होवून महागाईने उच्चांक गाठला आहे.त्यामुळे कोरोना महामारी , नैसर्गिक आपत्तीमुळे समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या सर्वसामान्य जनतेला वाढत्या महागाईमुळे जगणे मुश्किल होवून बसले आहे.या महागाई विरोधात जनजागरण अभियानाचा कार्यक्रम राष्ट्रीय काँग्रेसने हाती घेतला आहे.त्याच अनुषंगाने
इचलकरंजी येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने
आज शनिवारी कृष्णानगर परिसरात वाढत्या महागाई विरोधात जनजागरणासाठी कॉर्नर सभा घेण्यात आली. सभेचे प्रास्ताविक अल्पसंख्याक समाजाचे कार्याध्यक्ष रियाज जमादार यांनी केले. शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला हलाखीत जीवन जगावे लागत असल्याचे सांगितले. संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राहुल खंजिरे यांनी, वाढत्या महागाईसोबतच वाढत चाललेली बेरोजगारी याला सर्वस्वी केंद्र सरकारच जबाबदार असल्याचे सांगत कडाडून टीका केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर यांनी, मागील आठ वर्षांतील भारतीय जनता पक्षाच्या धोरणांचा पंचनामा केला. त्यामध्ये गेल्या काही वर्षांत वाढलेली बेरोजगारांची संख्या, आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमी होऊन देशातील इंधनाचे वाढत चाललेले भाव त्याचा एकूण परिणाम देशांतर्गत वाढलेल्या महागाईवर झाल्याचे नमुद करत या सर्वांची खरी झळ सर्वसामान्य जनतेला बसली आहे. त्याचबरोबर देशातील वाढते धार्मिक धृवीकरण, सामाजिक अशांतता याचेही परिणाम देशाला भोगावे लागत असल्याचे सांगितले. भाजपाच्या मागील आठ वर्षांच्या केंद्रातील भोंगळ कारभाराचा पंचनामा करुन सर्वसामान्यांना पुन्हा बळ मिळण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसला बळकटी देण्याचे त्यांनी
आवाहन केले.
यावेळी राष्ट्रीय युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद खुडे ,
युवराज शिंगाडे, बिस्मिल्ला गैबान, शशिकांत देसाई यांनी, केंद्र सरकारच्या विरोधात टीकास्त्र सोडले.तसेच नकारात्मक धोरणांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी समीर शिरगावे, प्रमोद नेजे, दीपक पाटील, रवी वासुदेव, ओंकार आवळकर, रविराज पाटील, दिलीप पाटील, अनिता बिडकर, तोसीफ लाटकर, सतिश कांबळे, योगेश कांबळे, राजू किणेकर, अजीत मिणेकर, चंद्रकांत मिस्त्री, शिवा चव्हाण, रियाज चिकोडे, दिलीप भोई, राजेश मस्कर,राहुल जावळे, सचिन साठे, अमीर सपसागर, शोएब मोमीन, राज शेख आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व भागातील नागरिक उपस्थित होते.