You are currently viewing तळेरे येथे उद्या पर्यावरण आणि तंबाखु विरोधी दिनानिमित्त कार्यक्रम

तळेरे येथे उद्या पर्यावरण आणि तंबाखु विरोधी दिनानिमित्त कार्यक्रम

तळेरे: प्रतिनिधी

जागतिक तंबाखु विरोधी दिन व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळेरे येथे रविवारी तळेरे येथील डॉ. अनिल नेरूरकर प्रेरित तंबाखु प्रतिबंध अभियानकडून विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यावेळी विविध मान्यवर तसेच, शालेय विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
गेली 9 वर्षे तंबाखु प्रतिबंध अभियानकडून तळेरे दशक्रोशीसह जिल्ह्यातील विविध भागात तंबाखु विरोधी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात. विशेष म्हणजे रक्षा बंधनाचे औचित्य साधून शासकीय अधिकारी, शिक्षक, पत्रकार, डॉक्टर आणि लोकप्रतिनिधी अशा समाजातील विविध घटकांना समाज प्रबोधन करण्यासाठी शपथबध्द करीत आले आहेत. यावेळी जागतिक तंबाखु विरोधी दिन आणि जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तळेरे येथे विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
रविवारी सकाळी 9 वा. तळेरे बसस्थानक ते प्रज्ञांगण अशी प्रभातफेरी काढण्यात येईल. बसस्थानकासमोर प्रबोधनात्मक पथनाट्य सादर होईल. यादरम्यान ढोल पथक व फुगडी होतील. यावेळी उपस्थितांना शपथ दिली जाणार आहे. त्यानंतर प्रज्ञांगण येथे सलाड डेकोरेशन, प्रज्ञांगण मध्ये आयोजित बांबू कार्यशाळेतील बांबू वस्तूंचे प्रदर्शन, विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा असा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक श्रावणी कंप्यूटर एज्युकेशन तळेरे, मेधांश कंप्यूटर इन्स्टिट्यूट कासार्डे व तंबाखु प्रतिबंध अभियानकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा