You are currently viewing वाभवे – वैभववाडीत आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून शहरात विकास कामांचा धडाका सुरू

वाभवे – वैभववाडीत आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून शहरात विकास कामांचा धडाका सुरू

गटार बांधणे कामाचा नगराध्यक्षा नेहा माईणकर यांच्या हस्ते शुभारंभ

वैभववाडी

वाभवे – वैभववाडी नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्र. 11 मधील फोंडा रोड ते लाकूड गिरण पर्यंत गटार बांधणे कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष नेहा माईणकर यांच्या हस्ते करण्यात आला. नगरोत्थान व इतर योजनेतून आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून या नगरपंचायतीमध्ये विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे. यातील काही कामे प्रगतीपथावर आहेत. तर काही कामे पुर्ण झाली आहेत.

प्रभाग क्रमांक ११ मधील फोंडा रोड ते लाकूड गिरण पर्यंत गटार बांधणे कामाचा शुभारंभ पार पडला. यावेळी उपनगराध्यक्ष संजय सावंत, नगरसेवक विवेक रावराणे, नगरसेविका संगीता चव्हाण, नगरसेविका सुंदरी निकम, शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश पाटील, सत्‍यवान पाटील, शरद सावंत, आदित्य चव्हाण आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा